श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 102 – कोणा का कळेना ☆
स्त्री मनाची ही व्यथा रे आज कोणा का कळेना।
अतं रीच्या वेदनांची गाज कोणा का कळेना।
माय बापाच्या घराचे सौख्यदायी बंध सारे।
तोडलेले यातनांचे काज कोणा का कळेना ।
अंकुरे हा बालिके चा कोंब मातेच्या कुशीचा।
गर्भपाता सज्ज होई राज कोणा का कळेना।
नामधारी योजनांचे भोग सारे भोगताना।
बाप भ्राता वा पतीचा बाज कोणा का कळेना
झीज सारी सोसते ही हुंदक्यांना का गिळूनी।
संस्कृतीच्या पूजकांचा माज कोणा का कळेना।
सोडवाना नार बाला श्वास घेण्या मुक्ततेचा।
रंजनाच्या चिंतनाचा साज कोणा का कळेना।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈