सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆मुक्ता… ! ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

(२५ मे रोजी मुक्ताई पुण्यतिथी होती, त्या निमित्ताने केलेली अभंग रचना…)

 निवृत्ती, ज्ञानाची,

 लाडकी बहीण,

 जगली क्षणक्षण,

 भावांसाठी !

 

बालपण गेले,

अकाली प्रौढत्व,

ज्ञानाचे तत्व,

सामावले !

 

ज्ञानदेव रुसला,

बंद ताटी केली,

मायेची मुक्ताई,

साद घाली !

 

पोरपण होते

मांडे करू वाटले,

ज्ञानाने चेतवले,

अग्नी रूप!

 

होती आदिमाया,

तिन्ही भावंडांची,

शिकवण  तिची,

नाम्यासही !

 

मुक्त झाली मुक्ता,

देह बुद्धी गेली ,

अमर राहिली ,

विठ्ठल कृपेत !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments