सौ.अस्मिता इनामदार
कवितेचा उत्सव
☆ स्पर्श… ☆ सौ.अस्मिता इनामदार ☆
घनगर्जत पाऊस आला
चहूबाजूंनी कसा बिलगला
ओल्या मिठीत सजणा
स्पर्श तुझा ओथंबला…
शिल्पासम काया माझी
लाजूनी हळू थरथरली
धारात लक्ष सरींच्या
तव मिठीत अलगद मिटली..
थेंबांची नक्षी सजली
भिजलेल्या गाली ओठी
घे टिपून अधरांनी ती
जी केवळ तुझ्याचसाठी…
चेतविले तुझ्या स्पर्शाने
स्पंदने अधीरली हृदयी
आलिंगन देऊन सखया
हा दाह आता शांतवी…
© अस्मिता इनामदार
पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ, वखारभाग, सांगली – ४१६ ४१६
मोबा. – 9764773842
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सुंदर भावपूर्ण अभिव्यक्ति