महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 86
☆ नम्रता असावी… ☆
अभंग ईश्वरा, मागणे मागतो
सदैव चिंतीतो, साह्य तुझे…!!
तुझा सहवास, मला प्राप्त व्हावा
माझ्यातला जावा, अहंकार…!!
नम्रता असावी, माझ्या वागण्यात
अर्थ जगण्यात, सापडावा…!!
तुझे सूत्र देवा, आचार घडावा
देह हा पडावा, तुझ्या द्वारी…!!
कवी राज म्हणे, आगाधा अनंता
तूच माय पिता, जगतिया…!!
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈