सौ ऐश्वर्या परांजपे
संक्षिप्त परिचय –
शिक्षा – B.Sc., B.Lib. Sc.
सम्प्रति – लायब्ररीयन म्हणून सर्विस केली.
सायन्सची विद्यार्थिनी असले तरी ओढा साहित्याकडेच.
“सखी” ह्या कवितासंग्रहाची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली .
कवितेचा उत्सव
☆ समृध्द रान!… ☆ सौ ऐश्वर्या परांजपे ☆
(भ्रष्ट व निर्लज्ज राजकारणी व तितकाच बेजबाबदार,नैतिक प्रदुषणयुक्त समाज,एखाद्या दिवशी मन वैफल्याने तडफडू लागते म्हणून अशी जळजळीत कविता सुचते)
जाणिवेच्या पातळीवर
डुकरेच ना आपण सगळे..?
छे…छे….
इथे वाघ..सिंह..चित्ते आहेत,
इथे कोल्हे..लांडगे…गेंडे आहेत,
इथे कावळे, बगळे, गिधाडे आहेत,
इथे नाग.. साप.. विंचू आहेत,
जंगली हत्तींचे कळप आहेत,
उन्मत्त, मस्तवाल गवे आहेत,
रानटी कुत्र्यांची झुंड आहे,
माकड चेष्टांचा कहर आहे!
भ्याड लपणारे ससे आहेत,
भेदरट पळपुटी हरणे आहेत,
सावज पळवणारे चोर आहेत,
फिल्मी नाचणारे मोर आहेत,
टिवटिवणारे पक्षी आहेत,
सुस्त अजगर साक्षी आहेत,
समृध्द आहे रान….
भीषण आहे हे समृद्ध रान!
© सौ ऐश्वर्या परांजपे
8104535935
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈