सुश्री गायत्री हेर्लेकर
कवितेचा उत्सव
☆ वंदु विठुचे चरण ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆
मना लागलीसे आस,
पांडुरंगा तुझा ध्यास ||१||
कानी घुमतसे सुर,
“विठु माऊली” गजर ||२||
डोळा दिसतसे वारी,
ज्ञाना-तुक्याची हो स्वारी ||
झुले पताका भगवी,
डोई तुळस हिरवी ||४||
गावोगावच्या अंगणी,
वारु नाचतो रिंगणी ||५||
टाळ-चिपळ्या घ्या करी,
आली पंढरी पंढरी ||६||
भुलोकीच्या या वैकुंठी,
संतजन गळाभेटी ||७||
पूर्वसंचित भक्तीचे
दर्शनासी या जन्मीचे ||८||
सदा हरीचे स्मरण ,
वंदु विठुचे चरण ||९||
© सुश्री गायत्री हेर्लेकर
201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.
दुरध्वनी – 9403862565
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈