कै. इंदिरा संत (इंदिरा दीक्षित)
कवितेच्या उत्सव
☆ मरवा ☆ कै. इंदिरा संत (इंदिरा दीक्षित) ☆
पुस्तकातली खूण कराया,
दिले एकदा पिस पांढरे,
पिसाहुनी सुकुमार काहीसे,
देता घेता त्यात थरारे.
मेजावरचे वजन छानसे,
म्हणून दिला नाजूक शिंपला,
देता घेता उमटे काही,
मीना तयाचा त्यावर जरला.
असेच काही द्यावे घ्यावे,
दिला एकदा ताजा मरवा,
देता घेता त्यात मिसळला,
गंध मनातील त्याहून हिरवा.
– इंदिरा संत
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈