श्री कपिल साहेबराव इंदवे 

(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है. आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है. एक युवा लेखक  के रुप  में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते. हमें यह प्रसन्नता है कि श्री कपिल जी ने हमारे आग्रह पर उन्होंने अपना नवीन उपन्यास मित……” हमारे पाठकों के साथ साझा करना स्वीकार किया है। यह उपन्यास वर्तमान इंटरनेट के युग में सोशल मीडिया पर किसी भी अज्ञात व्यक्ति ( स्त्री/पुरुष) से मित्रता के परिणाम को उजागर करती है। अब आप प्रत्येक शनिवार इस उपन्यास की अगली कड़ियाँ पढ़ सकेंगे।) 

इस उपन्यास के सन्दर्भ में श्री कपिल जी के ही शब्दों में – “आजच्या आधुनिक काळात इंटरनेट मुळे जग जवळ आले आहे. अनेक सोशल मिडिया अॅप द्वारे अनोळखी लोकांशी गप्पा करणे, एकमेकांच्या सवयी, संस्कृती आदी जाणून घेणे. यात बुडालेल्या तरूण तरूणींचे याच माध्यमातून प्रेमसंबंध जुळतात. पण कोणी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून झालेल्या या प्रेमाला किती यश येते. कि दगाफटका होतो. हे सांगणारी ‘मित’ नावाच्या स्वप्नवेड्या मुलाची ही कथा. ‘रिमझिम लवर’ नावाचं ते अकाउंट हे त्याने इंस्टाग्रामवर फोटो पाहिलेल्या मुलीचंच आहे. हे खात्री तर त्याला झाली. पण तिचं खरं नाव काय? ती कुठली? काय करते? यांसारखे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. त्याची उत्तरं तो जाणून घेण्यासाठी किती उत्साही आहे. हे पुढील भागात……”

☆ साप्ताहिक स्तम्भ #7 ☆ मित….. (भाग-7) ☆

रिमझिमला समोर पाहताच तो तिच्याकडे फक्त पाहत राहिला. ते छोटे छोटे मांजरीवाणी डोळे, काहीसे लांब मुलायम केस, उंची थोडी कमी होती. पण शरीर रचना अशी की एखाद्या  नटीला मागे टाकावं. आणि चेह-यावरचे तेज असे की झोपलेल्या सृष्टीला जागे करण्यासाठी दिनकराने तेज भरावे असे होते. तिला पाहताच सागरात डोलफ़िनने उंच झेप घेऊन आपला आनंद साजरा करावा. असं त्याचं मन अगदी आनंदाच्या सागरात उड्या मारत होते.

तिची सैरभैर फिरणारी नजर बहूतेक त्यालाच शोधत असावी. चहुबाजुला तिने आपल्या नजरेचा पसारा मांडला होता.  तेवढयात एक पन्नास – बावन वर्षांचा गृहस्थ येऊन तिला काहीतरी बोलू लागले. ती ही त्यांच्या गोष्टींना होकारार्थी मान हलवली. थोडे काळजीचे भाव चेह-यावर होतेच.  तिचे वडिल असावेत. असा मितने कयास बांधला. एक बारा वर्षाचा मुलगा, पंधरा साळा वर्षाची मुलगी, आई, बाबा आणि रिमझिम असा सारा परिवार तेथून जायला निघाला. रिमझिमने मागे वळून प्लॅटफार्मवर नजर भिरकावली. तेव्हा मित तिच्या अगदी जवळ उभा होता. ती थोडी घाबरली. पण तिला आनंद सुध्दा झाला. ते एकमेकांकडे बघतच राहिले. तिचे बाबा जवळ आले तेव्हा मितने त्याना नमस्कार केला.

मित- “नमस्ते अंकल. मै मित.”

ज्योतीप्रसाद – “नमस्ते बेटा. मै ज्योतीप्रसाद. रिमूने आपके बारे मे बताया.”

मित- “जी अंकल. हम दोनो बहोत अच्छे दोस्त है.”

मित त्यांच्यासोबत त्यांना हाटेलला गेला. त्याचा मनमिळाऊ स्वभाव आणि प्रभावी बोलणे यामुळे तो लवकरच त्यांच्या पुरण परिवारात मिसळला. रूमला बॅग वगैरे ठेऊन रिमझिमचे बाबा आणि मित सोफ्यावर गप्पा मारत बसले होते.

ज्योती प्रसाद- “आपकी बातें बहोत अच्छी हैं बेटा. लगता नहीं कि  पहली बार मिले है.”

मित- “जी  शुक्रिया अंकल. बस मम्मी पापा की मेहरबानी और आप जैसे बड़ो की दूवा है.”

गप्पा करत असताना मितचा फोन वाजू लागला. त्याने तो उचलला. प्रियंकाचा होता.

मित- “हॅलो”

प्रियंका- “अरे कुठे आहेस तू. आणि किती फोन केले तुला. कमीत कमी फोन तर रिसिव्ह कर.”

मित- “अगं हो… सोर्री… मी  एका महत्वाचा कामात अडकलो होतो. म्हणून…..”

प्रियंका- “अरे म्हणून काय, येतोयस ना. उशीर होतोय नाटकाला.”

मित- “ओके. तुम्ही पोहोचले का नाट्यगृहाला”

प्रियंका- “नाही. मी आता सी. एस. टी. ला आहे.  आणि लवकरच पोहोचतेय. तू पण जिथे असशील तिथून ये लवकर”

मित – “बरं चल मी येतोय.”

त्याने फोन ठेवला.

मित – “अंकल वो कूछ ज़रूरी काम है मै वो पुरा करता हूँ तब तक आप फ़्रेश हो जाईए.”

ज्योति प्रसाद- “अरे बेटा कहा चल दिए.”

मित- “जी अंकल, वो हमारे कॉलेज का ड्रामा कॉम्पटिशन है. और हमारी कॉलेज जो ड्रामा प्ले कर रही है वो मैने लिखा है और डायरेक्ट भी मै हक कर रहा हूँ. क्या आप आना पसंद करोगे.”

ज्योती प्रसाद- “अरे नही बेटा, हम अभी इतनी दुर से सफर करके आए. अभी कुछ देर आराम करेंगे. फिर बाद मै और भी घुमना है. आप चाहो तो बच्चो को ले जाओ”

त्यांनी नजर वळवून मुलांकडे पाहीले. गिरीष एकदम थकलेल्या अवस्थेत म्हटला

गिरीष- “मै बहोत थक गया हूँ पापा मै नही जाऊंगा”

सागरीकाचेही काहीसे असेच सुर होते. रिमझिमच्या आईला मात्र नाही म्हणणे योग्य वाटले नाही. ती म्हटली

आई- “अगर नही गए तो उन्हे बूरा लगेगा. चलिए ना ”

रिमझिम आईच्या सूरात सूर मिसळून

रिमझिम- हा पापा. और हम आये ही है महाराष्ट्रा घुमने.”

ज्योती प्रसाद ( स्वतःशीच) – हाँ. और ये लडका विश्वास करना के लायक है या नही ये भी पता चल जाएगा. (रिमझिमला) सुनो तुम सब अपना मोबाईल लोकेशन ऑन रखना. मै वो लोकेशन पुलिस मे शेयर करता हूँ. ताकि वो हम पर नजर बनाए रखेंगे ”

कितीही झालं तरी स्वतः आणि एक पिता म्हणून मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे भागच होते. आसामी भाषेत केलेली ही चर्चा मितला काही कळली नव्हती.

मित त्यांना घेऊन शिवाजी नाट्यमंदीर, सी.एस.टी. ला पोहोचला. त्याच्या टीमला भेटला. त्याने टीमसोबत रिमझिमच्या कुटूंबाची ओळख करून दिली. संघरत्नला सगळी कहाणी माहीती होती. तो त्याला बाजूला घेऊन गेला.

संघरत्न- “क्या बॉस तु तर म्हटला होता की फ्रेंडशीप ठेवणार. आणि तू तर उसे घर तक …….”

मित – “ए तसं नाहीये काही….. (थोडं होकारार्थी मान हलवत) तसंच आहे काही….. पण तिला इथे मी नाही बोलावलं. फॅमिली टूर साठी आलीय इथं ती.”

संघरत्न- “अरे असू दे ना. आली ना…. मग कधी सांगतोयस”

मित- “काय?”

संघरत्न – “अरे कधी मारतोयस प्रपोज.”

मित – “काय?”

संघरत्न- “घाबरतोयस. हवं तर मला सांग मी करून देतो. आखिर दोस्त कब काम आयेंगे.”

मित- “ए फालतू कांहीही बरडू नकोस हं…. असं नाही. काहीतरी स्पेशल व्हायला हवं.”

संघरत्न- “मग काय शॅपेनच्या बाटलीत रिंग टाकून देणार आहेस का”

मित- “नाही रे. उलटा लटकून कीस करावी लागेल नाही तर ……”

दोघेही हसले.

  क्रमशः

 © कपिल साहेबराव इंदवे

मा. मोहीदा त श ता. शहादा, जि. नंदुरबार, मो  9168471113

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments