सुश्री उषा जनार्दन ढगे
परिचय
प्रथितयश साहित्यिक थिओसाॅफीस्ट तीर्थरुप कै. ज.ना.ढगे यांची कनिष्ठ कन्या..
बालपणापासून साहित्यिक वातावरणात जडणघडण..
चित्रकलेची संगीताची विशेष आवड
कलाशिक्षण— सर जे.जे.स्कूल ऑफ़ आर्ट
GD in Fine Art (1979)
GD in Metal craft ( Enamelling-1981) राज्यात सर्वप्रथम..
३५ वर्षे सौंदर्यतज्ञ व मार्गदर्शिका व्यवसाय
पोटनाळ हा पहिला प्रकाशित कवितासंग्रह
९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनात (बडोदे) कवितेची निवड व सहभाग
छंद— लेखन, काव्यलेखन, रेखाचित्रे व व्यक्तिचित्रांचे रेखाटन..
?️? चित्रकाव्य ?️?
☆ सूर्याय नमः ?? ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆
☀️ सूर्याय नमः ☀️
तूच अरुण तूच रवि
तूच श्रेष्ठ भास्कर..
विनाशूनी अज्ञान
नाशितोस अंधःकार..
तूच भानू सूर्य तूची
आदित्य दिवाकर
तूच समयसूचक
सुख-समस्त दीपांकर..!
भ्रमत नित्य पूर्वपंथे
पश्चिमेस तुझा अस्त..
सुवर्णचर्या पाहता
क्लेश दरिद नाशवंत..
दिपवूनी किरणप्रकाशे
तेजाळत सहस्रहस्त..
दिशादिशांस उजळत
तूच एक सत-सुनृत..!
© सुश्री उषा जनार्दन ढगे
२२-०४-२०२०
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈