सुश्री मंजुषा सुनीत मुळे
चित्रकाव्य
☆ “एक इवलंसं रोपटं ..” – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
(जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!)
इवलंसं रोपटं मी
तू म्हणालास तर मरून जाईन –
ओंजळभर पाणी दे मला
आयुष्यभर तुझ्या कामा येईन –
दिलं जीवदान मला तर
तुला जगायला प्राणवायू देईन –
जगवलंस मला तर
तुझ्या देवांसाठी फुलं देईन –
फुलवलंस मला तर
तुझ्या मुलांसाठी फळं देईन –
तळपत्या उन्हामध्ये
तुझ्या कुटुंबाला सावली देईन –
तुझ्या सानुल्यांना खेळावया
माझ्या खांद्यावर झोका देईन –
तुझ्या आवडत्या पाखरांना
मायेचा मी खोपा देईन –
कधी पडला आजारी तर
तुझ्या औषधाला कामा येईन –
झालो बेईमान जरी मी
शेवटी तुझ्या सरणाला कामा येईन –
कवी : अज्ञात
प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈