सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– कलीयुगीचा शिशु मारूती…–
☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
लोखंडी गज धरून हाती
सुपुर्त केला चिमण्या दाती
जोर लावुनी तोडू पाहतो
कलीयुगीचा शिशु मारूती ….
☆
जोर लावता किती तुटेना
बालमारूती मागे हटेना
डोळे वटारून भिती दावतो
कुणास पण ! तेही कळेना
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈