सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– सराव…– ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
शिक्षण आता बास झालं
कार्यक्रम करावे म्हणतो
माईक धरून गाण्याचा
म्हणून सराव करतो.
☆
रसिकांसमोर तसंच जाणं
खरं म्हणजे धाडस आहे
लपून छपून सराव करणे
सध्या माझे चालू आहे
☆
माईकशी मेळ जमला की
कार्यक्रम करणार बरं
ऐकायला सगळे याल ना !
सांगा अगदी खरं खरं
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈