सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– छत्री म्हणू की…– ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
छत्री म्हणू की याला फूल
मनास पडली माझ्या भूल
इवले इवले नेत्र तयाला
नकटे नाकही दिसे अनुकूल ….
☆
छोटीशी जीभ वेडावून हे
दाखविसे का पर्ज॔न्याला
रक्षणास्तव उभा ठाकूनी
का भिजवीशी म्हणे आम्हाला ….
☆
नाजुक इवला जीव परी
धाडस याचे मोठे बाई
पाऊस पडला जोरात तर
फाटून जाऊ ,तमा ही नाही ….
☆
तमा कशाला करील वेडे
जीवन तयाचे एक दिसाचे
हासत खेळत मिस्किलतेने
आनंदात ते जगावयाचे …..
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈