सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– तंटामुक्तता… –
☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
घराघरात दारादारात
गल्लीबोळात, रस्त्यावर – माळावर
हाॅटेलात ,दुकानात ….
तंटा भांडण यांचं प्रमाण वाढू लागलं
शहाण्यांनी काही उपायही काढलं
सर्वानुमते एक ठरलं
तंटामुक्त समिती स्थापण्याचं ठरलं
सगळे जमले चर्चा चालली
तंटामुक्त समिती स्थापन करायची
कल्पना नक्की झाली
समितीला अध्यक्ष कुणी व्हावे … चर्चा अगदी रंगात आली
तु होणार तर मी का नको
आवाजाचा घुमु लागला एको
कुणीच कुणाच ऐकुन घेईना
ओरडलं तरी काहीच कळेना
मुद्यावरुन गुद्यावर आपोआपच आलं
बैठकीचं रूपांतर हाणामारीत झालं
मुद्दा राहिला बाजूला —
गोंधळाची सगळ्या …. बातमी मिळाली पेपरला !!!!
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈