सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– माझे विसर्जन… –
☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
विसर्जन न करता मला
इथे ठेवलं बरं झालं
पृथ्वीवरील निसर्गात
निवांतपणे रहाता आलं —
☆
उत्सवातला कलकलाट
ऐकू येणं बंद झालं
पाण्यातील विसर्जनाने
हळूहळू विरघळणं ठीक वाटलं —
☆
डॉल्बीचा दणदणाट नि लेसरची
नकोच वाटते भक्ति भीक
एवढे मोठे कान माझे
कर्कश्श आवाज आणखी —
☆
मोठा मोठाच वाटतो
त्यापेक्षा अशा निसर्गात
शांतपणे राहण बर
मीच निर्मिल्या निसर्गात —
☆
हळू हळू मिसळण खर
माझ्या मूर्ती दान करा
कलाकाराला परत द्या
नव रूप घेऊन त्यातून
भेटेन पुढल्या वर्षी तुम्हाला
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈