सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– “चांद उगवला आणि…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
चांद उगवला
वरती आला
शितल दुधाळ
प्रकाश पडला
☆
तो अवचित
बाहेरी आला
शितल प्रकाश
भूलवी मनाला
☆
त्याने प्रियेला
साद घातली
आले म्हणतच
धावत आली
☆
तो नभीचा चंद्र
अन हा माझा
म्हणता त्याने
चक्क लाजली
☆
रोखून बघता
मुखास त्याने
लाजून बाहूवर
मान टेकली
☆
आगळेच हे
युगुल पाहूनी
चांदणे उतरून
आले खाली
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈