सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– “घरटे…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
घरटे झाले वेळीच बांधून
इवल्याशा काड्यांनी सांघून
बाहेरून आता नीट पहाते
चुकून काही गेले का राहून —-
☆
आत मऊशी गादी झाली
जागाही सुरक्षित मिळाली
अन पंख फुटेपर्यंत मनीची
पिल्लांची काळजीही मिटली —-
☆
वाट पहाता काही दिसांनी
घरटे बोलेल चिवचिवाटांनी
त्याच क्षणाची वाट पहाते
पंखाखाली घेईन त्या क्षणी —-
☆
जन्मोत्सव माझ्या पिल्लांचा
याच महाली करावयाचा
होईल सुरू मग नवाच दिनक्रम
चिमण्या चोचींना भरवायाचा —-
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈