श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
– भावुक कॅमेरामन…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆
☆
कृतार्थ हा भाव | आसवे लोचनी |
कॅमेऱ्याचा धनी | सुखावला ||१||
*
राघवाची मूर्ती | वसे गाभाऱ्यात |
छबी कॅमेऱ्यात | टीपण्यासी ||२||
*
सुवर्ण क्षणांचे | थेट प्रक्षेपण |
पाही भक्तगण | दूरवर ||३||
*
कॅमेऱ्याच्या मागे | माणूसच उभा |
हृदयाचा गाभा | भक्तीमय ||४||
*
मंगल सोहळा | टीपण्याचे भाग्य |
जन्माचे सौभाग्य | याची देही ||५||
*
ज्याची त्याची झाली | कृतार्थ लोचने |
राघव दर्शने | त्रिलोकात ||६||
*
भावनांना केली | मोकळी ही वाट |
सोहळ्याचा थाट | टिपतांना ||७||
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈