सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– “फुले बकुळीची…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
कळीच्या रूपाने मुग्ध बाल्य
पुर्ण फुललेल गंधीत तारुण्य
सृष्टीचक्र हे स्वीकारले तर
सुकल्या फुलाचे निर्माल्य …..
*
नक्षीदार हे दोन करंडे
सुगंधाने पूर्ण भरलेले
स्वर्गामघूनी भगवंताने
वसुंधरेस पाठविलेले …..
*
तया संगती मुग्ध कलिका
हात धरूनी खाली आली
रूप उद्याचे आज न्याहळी
आपसूक लाली येई गाली …..
*
पलीकडचे फुल सुकलेले
पाहून बकुळ नाही ढळले
जीवनातील सत्य स्वीकारत
जगणे इवले तयास कळले …..
*
बकुळ म्हणे सुकले तरी मी
इथेच असेन सुगंध रूपाने
कवी लेखक जसे वावरती
अक्षरातुन साहित्यरुपाने …..
*
माघ्यम कुठलीही भाषा
जगातील कुठलाही देश
क्षर ना जयाला ते अक्षर
चिरंतन असो वेगळा वेष …..
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈