सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
☆ अप्रूप… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
प्राचीवरी सूर्य
उदयास येई
सुवर्णमय प्रभा
गगनास देई
*
निळेशार अंबर
कनकाची झिलई
अवर्णनीय शोभा
नभी व्यक्त होई
*
पाहून ऐसे हे
सृष्टीचे स्वरूप
जगन्नियंत्याचे
वाटे मना अप्रूप
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈