सुश्री नीलांबरी शिर्के
☆ भेट सावळ्याची… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
वैजयंती माळा
विठ्ठलाचे गळा
सुखाचा सोहळा
डोळ्यापुढे माये
*
चंदनाची उटी
मंजिरीचा गंध
भक्तिमय मन
जाहले गे माये
*
तुलसी दर्शन
भेट सावळ्याची
घरातच मज
घडली हो माये
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈