श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
– वटवृक्ष… – ☆श्री आशिष बिवलकर ☆
☆
कुटुंबवत्सल वटवृक्ष,
पसरला दाट दुरवर!
घनदाट छाया त्याची,
वाटसरूच्या शिरावर!
*
लहान मुले खेळती बागडती,
खेळती सुरपारंब्या मनसोक्त!
मोठ्यांना मोह न आवरे खेळाचा,
टांगाळून घेती आनंद होऊन मुक्त!
*
प्राणवायूचे संतुलन राखतो,
विषारी वायू स्वतः शोषून!
सहवास त्याच्या सोबत असावा,
सांगती शास्त्र आपणा उद्देशून!
*
भूजल साठा करतो मुळाशी,
सोडतो बाष्प उन्हाळ्यात!
अक्षयवृक्ष म्हणती यासी ,
हिरवागार साऱ्या ऋतूकाळात!
*
सुहासिनी पूजती यास,
मागती दीर्घायुष्य पतीचे!
जन्मोजन्मीची साथ मांगे,
पूजन करती पतिव्रतेचे!
*
उपयोग याचे असती अनेक,
दूर करी दंतदुखी असो मधुमेह!
लेप याचा ठरे मोठा गुणकारी,
आयुर्वेदात महत्व नि:संदेह !
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈