सुश्री अपर्णा परांजपे

?️?  चित्रकाव्य  ?️?

?  तू शांत कसा रे ? ☆ सुश्री अपर्णा परांजपे ?

शांत कसा भगवंता तू

शांत कसा रे? 

फक्त अर्जुनच का रे

आता शांत कसा रे? 

तू शांत कसा भगवंता? ||धृ||

*

किती बदलला मानव सारा

स्वधर्म विसरून स्वार्थी सारा

कुणी कुणाला मानत नाही 

कुणी कुणाशी बोलत नाही 

शांत कसा भगवंता?

रे शांत कसा भगवंता?||१||

*

आतच वसती तुझी असताना

कसा पाहतो चुक करतांना

प्रेमाचे मूळ स्वरुप हे 

विसरून वैर जागवताना

शांत कसा भगवंता? 

तू शांत कसा भगवंता?||२||

*

महाभारती युध्द दोन गट

कलियुगी मात्र युध्द अंतरंगी

कुरूक्षेत्री तू अर्जुन सारथी 

हृदयातील आत्माराम या जगी

शांत कसा भगवंता 

तू शांत कसा भगवंता?||३||

*

अर्जूनास विषाद असूनही 

प्रेमापोटी बनलास सारथी

आता तो विषाद‌ नाही 

वस्ती असूनही हृदयामध्ये 

शांत कसा भगवंता 

तू शांत कसा भगवंता?||४||

*

जग सगळे मायेत अडकता

मायेची अपरिमित सत्ता

एक लेकरू मारी हाका

भगवंता हृदयी तव सत्ता 

शांत कसा भगवंता 

रे शांत कसा भगवंता?||५||

*

जागृत भक्ती करता येईल 

हीच शांतता प्रकट होईल

निर्विकल्पता येऊन पदरी

पडेल प्रशांतता..

शांत कसा भगवंता 

रे शांत कसा भगवंता.. ||६||

*

चुकलो चुकलो शांत तुज म्हणता

तू होता, आहे व असणारही

शांत प्रशांत हा स्वभाव दैवी

कसा तू सोडणार? 

शांत “असा” भगवंता 

तू शांत “असा” भगवंता…. ||७||

*

🌹 भगवंत हृदयस्थ आहे 🌹

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
3 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments