?️?  चित्रकाव्य  ?️?

? अस्तित्वाची लढाई / सृष्टीचे एकच उत्तर – चित्र एक काव्ये दोन ☆ सुश्री नीलांबरी शिर्के आणि श्री आशिष बिवलकर 

सुश्री नीलांबरी शिर्के

(१) अस्तित्वाची लढाई

तनामनाच बळ

जेंव्हा एकवटत

एवढासा अंकूर

जमिनीतून येतो

*

नाजुक असतो

बीज फुटवा

कोमल नाजुक

जरी दिसतो

*

जगण्याचा प्रयत्न

अस्तित्वाची लढाई

याच सगळयाचा

तो परिणाम असतो

*

प्रयत्नापुढे त्याच्या

भूमीही नमते

मूळ ओटीपोटी धरून

वाढ पिल्ला म्हणते

*

अंकुर मुळे भू ला देते

वरती विस्तार करते

शेवट पर्यंत भूमातेची

 साथ धरूनच रहाते

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

श्री आशिष बिवलकर

(२) सृष्टीचे एकच उत्तर 

अंकुरते बीज,

दूर सारून माती |

बीजात असते बळ,

जीवनाला मिळे गती |

*

मातीच्या गर्भात,

काळाकुट्ट अंधार |

थेंब थेंब जीवनाचे,

अंकुरण्यास आधार |

*

मोकळ्या आभाळाखाली,

उन वारा पाणी देई आशा |

उंच वाढवे आणि बहरावे,

उपजत सामर्थ्यांची भाषा |

*

वादळ वारा सोसत,

करी संकटावर मात |

पुढे पुढे वाढत जाई,

जीवनाचे गाणे गात |

*

चराचरात चाले,

बीजरोपण निरंतर |

नावीन्याची सुरवात,

सृष्टीचे एकच उत्तर |

© श्री आशिष बिवलकर

बदलापूर 

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments