सुश्री नीलांबरी शिर्के
☆ हसरी जोडी… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
बुट म्हणून जन्मापासून
हसत असते यांची जोडी
पाय अडकवता विश्रांती
मिळे हास्या आपसूक थोडी
*
माती चिखल दगड धोंडे
इमानाने तुडवत जातात
पायापासून मुक्त होताच
हास्यमुद्रा आपसूक होतात
*
जे करायच ते प्रामाणिकपणे
हसत हसत करत जावं
बुटाची जोडी शिकवते
कण्हत की गाणं म्हणत जगावं
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈