सुश्री शीला पतकी

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ “मधुबाला…” ☆  डॉ. शैलजा करोडे

ठाऊक नाही यातील काही /

गोड गोड मधुबाले /

तुझ्या हृदयाला यौवनात ग /

छेद कशाने झाले//

*

कुरळे कुरळे केस तुझे हे/

असंख्य त्यातील वाटा /

कितीक गुंतले किती हरवले/ 

चेहऱ्यावरच्या बटा //

*

मोहक सुंदर दंतपंक्ती ती /

रसरशीत ओष्ठ कमान /

नयन निरागस बालकापरी /

तरी यौवनाचे आव्हान //

*

जीवणी मोहक जीवघेणी ती /

आरक्त गाल ते छान/

 भुवयांची ती महिरप सुंदर /

वर सुंदर भव्य कपाळ//

*

कित्येकाने स्वप्नात ठोकले/

 तव हृदयाचे द्वार /

त्या साऱ्यांच्या ठोक्यांनी मग /

झाले छिद्र तयार? //

*

जीवघेणी ही ठोकाठोकी/ 

हृदयस्पंदने चुकली /

अन रसिकांचा ठोका चुकून /

मृत्यू पुढे ही झुकली//

*

नको आभूषण नको विशेषण/ 

तुझ्यासारखी तूच /

देवाने ही पुन्हा न केले/

 कॉपी-पेस्ट हे रूप //

*

पुन्हा न होणे ऐसे रूपडे /

पुन्हा न ऐसा भाव/

 सौंदर्याला समान शब्द हा /

मधुबाला हे नाव!!!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments