सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– अजुनी रूसुन आहे – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
😊
अजुनी रूसुन आहे
खुलता कळी खुलेना
विनवून पाहीले मी
इकडे मानही वळेना
😊
चुकले कशात माझे
हे काही आकळेनी
😊
किती किडे,अळ्या मी
हुडकून आणल्या हो
त्यातील चव कुणाची
प्रियेस का रूचेना
😊
रानावनात फिरलो
गवतातूनी हुडकलो
पण वेगळ्या चवीची
हिस भूल का पडेना!
😊
चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈