सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– मोत्याचे सौंदर्य –
☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
अंगावर काटे निसर्ग देण
हात तरी लावणार कोण ?
मलाच माझे सौंदर्य आवडे
दुजे जवळ करतील कोण ?
☆
थंडी पडली काकडलो मी
अंगोपांगी थरथरलो मी
धुक्याने शाल दिली मज
पांघरली मी प्रेमभरानी
☆
दिनकर येता पुर्वदिशेला
पट धुक्याचा विरून गेला
जाता जाता आठव म्हणूनी
थेंब दवाचे मज देता झाला
☆
त्याच दवांच्या थेंबाना मी
कंटकावरीवरी हळू तोलले
सुर्यकिरण त्यावरी पडता
मोत्याचे सौंदर्य लाभले
☆
चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈