सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– आत गोडवा वर काटेरी – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
वरवरचे हे रूप तुझे रे
ऊगा कशाला असे दावशी ?
बाहेरून तू ओबडधोबड
पोटी तुझ्या रे अमृत राशी
☆
काही चांगले हवे असे तर
कष्टायाची करा तयारी
हेच सांगते रूप तुझे रे
आत गोडवा वर काटेरी
☆
मिळवायास्तव गरे आतले
हवीच असते शक्ति युक्ति
सहज लाभे तुझा गोडवा
प्रयत्नांवर असावी भक्ति
☆
चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈