सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– सोनेरी किरणे धरतीवर – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
रविराज अस्ताला जाता
धरतीवर तम हळुहळू येतो
पांधरूनी काळी शाल जगी
कुशीतली उब सकलांना देतो
☆
निद्रीस्त होती, विश्रांती घेती
श्रमणारे जीव आपोआप
काही ठिकाणी अंधारातच
चोरटेपणाने फिरते पाप
☆
पूर्वदिशेला दिनकर येता
तमस हळू निघूनी जातो
सोनेरी किरणे धरतीवर
कणकण उजळीत रहातो
☆
चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈