मॉरीसेट कांगारू वाइल्ड लाइफमधून बाहेर पडून लोक क्रूसनच्या वाटेकडे पाहत होते. आमच्या शेजारी दोन स्त्रियाँ उभ्या होत्या. दोघीही परदेशी होत्या. माझ्या कपाळावर कुंकू बघून एक स्त्री म्हणाली – “इंडिया !”
मी “हो” म्हणाले.
“ब्यूटीफूल कंट्री”.
“तुम्ही भेट दिली होती का!”
“नाही, पण माझी मुलगी तिथे होती …. फॅमिली बॉन्डिंग अँड ह्यूमन रिलेशनशिप इज व्हरी स्ट्रॉंग इन इंडिया!”
“हो!” मी स्मितहास्य देत म्हणाले.
“ऑस्ट्रेलिया सुंदर देश आहे “.
“हो … सुंदर आणि विकसित देश.”
त्यांनी आपल्या देशाच्या प्रगतीबद्दल बरेच काही सांगितले. मी उत्सुकतेने चौकशी केली
“येथील सामाजिक आणि कौटुंबिक रचना आहे ?”
अचानक तिचा उत्साह थांबला. तिच्या वार्धक्यातल्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांचे आकार एकाएकी बिघडले. श्वास सोडत ती मोठ्या आवाजात बोलली.
“कृपया येथील रचनांबद्दल विचारू नका! खूप बीटर एक्सपिरियंस…”
मला माझ्या प्रश्नाचे उत्तर सापडले तसेच हा सांस्कृतिक वारसा जोपासण्याच्या विचारांनी मनात उत्तम आकार घेतला होता.
© डॉ. वसुधा गाडगीळ
संपर्क – डॉ. वसुधा गाडगिल , वैभव अपार्टमेंट जी – १ , उत्कर्ष बगीचे के पास , ६९ , लोकमान्य नगर , इंदौर – ४५२००९. मध्य प्रदेश.
मोबाईल – 9406852480
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈