श्रीशैल चौगुले
जीवनरंग
☆ सत्य आणि फोन ::::: एक अलक ☆ श्रीशैल चौगुले ☆
सेवानिवृत्त्त वरिष्ठ आभियंता,जीवनप्राधिकरण विभाग,अधिकाऱ्याने आत्महत्या केलेली वार्ता सर्वत्र राज्यभर पसरली खरी. परंतु पोलीस तपास हेरखाते चौकशीत रात्री कुठून तरी चार फोन आलेले मोबाईलवरती आढळले. सदरील नंबरवर साईबरकडून हार्डवेअर सिस्टीम आॕडिओ काॕलींग ओपन करुन पाहिले तर एकच संदेश वेगवेगळ्या चार व्यक्तींनी केलेले ऐकविणेत आले.
“ हॕलो साहेब,तुमच्यावर दोन कोटी जलपुरवठा खात्यात भ्रष्टाचाराचा आरोप असून सकाळी अटक सत्रासाठी आमचे हेरपथक येणार असून आपण मानसिकदृष्ट्या संतुलनाने सज्ज रहावे.”
रात्री ठिकः १२ः०५ ,१२ःः०७,१२ः०९व १२ः११.या वेळेत झालेले फोन आढळले.
व आत्महत्या पहाटे ४ः५४ च्या सुमारास झालेले तपासात निषपन्न झाले.
मात्र दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांचा वाढदिवस होता व त्यांना “महाराष्ट्र राज्य प्राधिकरण उत्कृष्ठ जीवन सेवा” हा विशेष सन्मानार्थ प्रशासकिय पुरस्कार जाहिर झालेली बातमी सर्व मिडीया प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली होती.
चौघांना ताब्यात घेतले असता आॕफिस स्टाफ मित्रवर्गाने वाढदिवस व पुरस्कार बातमी आश्चर्याचा आनंदी हेतूने थट्टा केल्याचा एकच रिपोर्ट चारी मित्रांकडून आला.
परंतु फोनवरील थट्टेने एका सेवाशील अधिकाऱ्याला पुरस्कार सन्मानास जीवंतपणी पहाता न आलेचे दुःख सर्व जि.प .व प.स. पासून सर्व प्रशासकिय खात्यास लपवता आले नाही. शोकांजलीकरिता तीन दिवस सुट्टी प्राधिकरण खात्यास जाहिर झाले.
१५ आॕगष्ट रोजी हा पुरस्कार सन्मान त्यांचे पश्चात श्रीमती पत्नीस अर्पण करणेत आला.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈