सौ. शशी नाईक-नाडकर्णी
☆ जीवनरंग ☆ आनंदाश्रम भाग-3 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆
दुस-या दिवशी सकाळी माधुरीच्या प्रतिकचा फोन, “मावशी तुझी कल्पना काय भारी आहे ग मला आणि हिला खूपच आवडली. एक्झॅक्टली वृध्दाश्रम नाही. पण तुमच्या मित्रमैत्रिणीचा वयस्कर आनंदाश्रम म्हणू हवं तर आईबाबा पण खूष. आम्हाला पण त्यांची काळजी रहाणार नाही. बाबा नियमितपणे घरी व्यायाम करत नाहीत. पथ्य पाळत नाहीत. आम्ही सांगायला गेलो तर वाद होतात. दिवसभर घरात दोघंच असतात भांडत बसतात. तुमच्याकडे सगळ्या बरोबर नियमित व्यायाम, पथ्य पण होईल. आम्हाला पण काळजी नाही. आनंदात रहातील दोघं. बरं तसं अंधेरी सांताक्रुझ म्हणजे अंतर पण फार नाही. वाटलं तर कधीही भेटू शकतात.
लगेच प्रकाशच्या जान्हवीचा फोन आला “आत्या, दी ग्रेट! तुझी आयडिया भन्नाट आहे. मला आणि ह्यांना एकदम पसंद” “अग, पण प्रकाश म्हणत होता तुझ्या शुभ्राला आजी आजोबांचा लळा आहे. तू नाही म्हणशील.” “अग आत्या ते बरोबर आहे, पण शुभ्रासाठी का त्यांना अडवून ठेवायचे. त्यांना करू दे ना आता उतारवयात तरी आपल्या मनासारखं. आयुष्यभर कुटुंबासाठीं, नंतर आम्हा मुलांसाठीं नोकरी सांभाळून घर. खूप कष्ट केले. आता बस झालं let them enjoy with you people.”
सुनिताच्या मुलीचा तर us वरुन फोन “मावशी तुझी आयडिया 101% आवडली. असं तर आई बाबा इकडे माझ्याकडे कायमचे यायला तयार नाही की दादाकडे बॅगलोरला पण जात नाहीत. तुमच्या सगळ्या बरोबर मज्जेत रहातील इकडे मला पण काळजी नाही.
विद्याचा मुलगा नितीश तर संध्याकाळी माझ्या घरी हजर,”मावशी तू माझं सगळं tension च दूर केलेस. तुझे आभार कसे मानू तेच कळत नाही”. “अरे आभार मानण्यासारखं मी काय केले? ते तरी सांग”. “अग मावशी, माझ्या बायकोचं आणि आईचं पटत नाही. आईला समजवावं तर ‘बायकोचा नंदीबैल, आणि बायकोला सांगायला जावं तर मम्माज् बाॅय’ही विशेषणं बर॔ दोघीही वाईट नाहीत दोघींची मते त्यांच्या परीने बरोबरच आहेत. पण कुठे माशी शिंकते कळत नाही. आणि घरांतले मनःशांती बिघडते. एवढे मात्र खरं. तू मात्र ह्या संकटातून माझी सुटका केलीस. परत जवळच्या जवळ कधीही जा ये करु शकतो.”
विजू बायको गेल्यापासून एकटाच रहात होता म्हणून ऑस्ट्रेलियात असणा-या मुलांने मला फोनवर सांगितले, ‘आत्या, तुम्ही बाबांना तुमच्या कडे घेऊन जा. मला चालेल काय विचारतात ते. त्याना म्हणावं धावेल त्यांनाच काय तुमच्या आनंदाश्रमाला लागेल ती मदत मी करेन. एक जोडपं care taker बरोबर अजून एखाद दोन मुली वरच्या छोट्या, मोठ्या कामाला पार्ट टाईम ठेवा. आता फक्त तुम्ही सर्वानी मज्जा, आराम करायचा. आणि आपापल्या तब्येती सांभाळच्या. माझी खात्री आहे माझे बाबा तुमच्या सगळ्यांबरोबर जेवढे आनंदात रहातील तेवढे कुठेच राहू शकणार नाही. त्यानी आमच्यासाठीं खूप खस्ता काढल्या. आईच्या आजारपणात पण त्यांची खूप ओढाताण झाली. माझी पण नोकरी इकडे नवीन असल्यामुळे माझी पण मदत नव्हती. तुमच्या सगळ्यांची मदत होती म्हणून आईचे आजारपण ते निभावू शकले. आता तिचे आयुष्य तेवढेच होतं. शेवटी ईश्वरी इच्छा.आता बाबांचे तरी आयुष्य तुमच्या सगळ्यांच्या सहवासात आनंदात जाऊ दे.
मला कल्पनाच नव्हती. सहज मनांत विचार येतो काय मी सगळ्यांना बोलावून, सांगते काय ते आपल्या मुलांच्या कानांवर घालतात काय आणि त्यांचा इतका छान आणि त्वरीत प्रतिसाद मिळतो काय?
आमचे पतिराज मला दोन दिवसापूर्वीच म्हणाले होते तुझी कल्पना चांगली आहे. पण त्याला प्रतिसाद फारसा मिळेल असं वाटतं नाही. तुला वाईट वाटेल. पण झालं उलटचं. पण छान. चला कामाला लागू या. मज्जा पुन्हा एकदा 40 वर्षा पूर्वीचे आयुष्य जगू या. कोणाचे बंधन नाही.
कोणाला नातंवंडाना शाळेच्या स्कूल बसचं tension नाही कि सुनेचे, मुलाचे डब्बे भरायला नको. कुणाच्या मुलांना आईबाबा इकडे उतारवयात कसे रहात असतील? ह्याचे साता समुद्रापार टेन्शन नको.
ते पण मजेत, आम्ही पण मजेत, आनंदात आणि याच आनंदात कधी तरी exit घेऊ या.
≡ समाप्त ≡
© सौ. शशी नाडकर्णी -नाईक
फोन नं.8425933533
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈