श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ जीवनरंग : लघुकथा – तीर ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
गर्दी एका घरासमोर एका बाणाच्या रुपात उभी होती. घराचा मालक चांगले मार्क मिळवून पास झाला. गर्दीतून तीर सुटले,
‘ जरूर कुठून तरी प्रश्नपत्रिका मिळाली असणार.’
त्या व्यक्तिला चांगला जॉब मिळाला.
‘ नक्कीच कुणाचा तरी वशिला लावला असणार.’
व्यक्तीचा विवाह झाला. एक सर्वगुण संपन्न पत्नी मिळाली.
गर्दीतून तीर आला, ‘त्याचा नशीब चांगलं म्हणून अशी चांगली बायको मिळाली.’
त्या व्यक्तिची मुलेदेखील चांगली शिकली आणि त्यांनाही चांगल्या नोकर्या मिळाल्या. त्यांची लग्ने झाली अणि त्या व्यक्तिला आता नातवंडेही झाली.
गर्दीतून सातत्याने त्याच्या दिशेने तीर येतच होते.
गर्दीच्या बाणांचा आघात झेलता झेलता अखेर ती व्यक्ती जीवनाच्या बंधनातून मुक्त झाली.
गर्दीने त्या व्यक्तीचं मृत शरीर पाहिलं. आता गर्दी आपल्या बाणांना धार लावून दुसर्या घरापुढे उभी होती.
मूळकथा – आघात मूळ लेखिका – रंजना फतेपूरकर
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈