☆ जीवनरंग ☆ खरच माझं चुकलच ☆ सौ. स्मिता माहुलीकर ☆
मी मिसेस प्रधान. मी माझ्या बद्दल जरा विस्तार पूर्वक सांगते. माझा जन्म एक संपन्न कुटुंबात झाला.मी एकूलत एक जरास लाडावलेल कन्यारत्न. कलकत्याला आमची मोठी बाडी म्हणजे बंगला होता. आसपास सतत नोकरांचा वावर. कॉलेज चे शिक्षण होस्टेल मधे झाले. स्वभावाने मी हेकेखोर आणि घमंडी म्हटले तरी चालेल. माझे लग्न आमच्या स्टेटसला शोभतिल असे प्रधान यांच्याशी झाले. येथे पण मी माझ्या टर्मस एन्ड कंडीशन प्रमाणे राहू लागले. आमचं अगदी व्यवस्थित चालले होते. यथोचित वेळेला ‘सोहम ‘ चा जन्म झाला. माझे सोशियल वर्क, जिम, क्लब वगैरे चालू होते. मला कधी डाउन क्लास माणसं आवडली नाहीत. त्यांचे ते मध्यमवर्गीय परंपरा जपण मला आजिबात पसंत नह्वते. सोहम सॉफ्टवेअर इन्जिनियर होउन जगप्रसिद्ध कंपनीत नोकरी ला लागला आणि अमेरिकाला स्थायीक झाला. आता आम्ही दोघे येथे आमच्या साम्राज्यात मज्जेत रहात होतो. आत्ता पर्यंत माझे अस ठाम मत होतं की पैसा आणि हुशारी असली की काही अडत नाही. आमच्या शेजारी कुलकर्णीबाई आणि कुटुंबीय राहत आहे. टिपीकल मिडलक्लास कुटुंब. मी नेहमी त्यांचाशी अंतर ठेवून होते. कुलकर्णी बाई रिटायर्ड लायब्ररीयन आहेत. त्यांना पुढे पुढे करायची सवय आहे.मी तर त्यांना खडसावून सांगितले
” मला असे कोणी उगाच लुडबुड केलेली आवडत नाही.” असो. हे असे आमचं हाई स्टँडर्ड जीवन चालले होते. आणि एके दिवशी कोरोना ची साथ आपल्या देशात येउन ठेपली!…
भारतात लॉक डाउन जाहीर केले तसे आमच्या कडे असणारे स्वयंपाकी, मोलकरीण, ड्राइवर,माळी सगळ्यांनीच येण बंद केले. जास्त पैसे देऊन सुद्धा कोणी काम करायला तैयार नह्वत. आणि आमची हुशारी साधा चहा बनवायला पण कामास येणार नाही!! कसे बसे कोर्न फ्लेक्स, ऑट्स हे खाउन एक दिवस निभावून काढला. दुसरा दिवस लॉक डाउन चा, मी सकाळी उठले आणि टेरेस बाल्कनीे मध्ये गेले जरा फूल झाडानं कडे बघावे म्हणून. पाहते तर काय सगळ्या कुंड्याची माती ओली! जसे कोणी आत्ता च पाणी घातले असावे ! देवा समोर सुद्धा कधी न झुकणारी मी चक्क आकाशाकडे पाहिलं आणि हात जोडून नतमस्तक झाले. तेवढ्यात दारावरची बॅल वाजली. मी दार उघडलं तर समोर कुलकर्णी बाई हातात कॅसरॉल घेउन उभ्या होत्या.त्या सरळ आत जाऊन डबा ठेवत म्हणू लागल्या ” गरम मेथी चे पराठे आहे ते खाउन घ्या.” मी आश्चर्याने बघत राहिले. “तुम्हाला कसे कळले की आमचा ब्रेकफास्ट बाकी आहे?” “अहो त्यात न कळण्यासारखे काय आहे. तुमच्या फूल झाडांना पण काल पासून पाणी मिळाले नाही नोकर माणसं नसल्याने, तर तुम्ही पण नीट काही खाले नसेल च. आधी झाडांना आमच्या बाल्कनीतुन च पाइपने पाणी शिंपडले. नंतर सुनबाईंनी केलेले पराठे तुमच्या साठी घेउन आले. ” ” तुम्ही अश्या कशा हो!” असे म्हणत मी त्यांचा कडे आभारित होउन पहात होते. “मी म्हटलं तुम्ही तुमचा ताठरपणा सोडणार नाही च अहात तर मग मी पण माझा मनमिळाऊपणा का सोडायचा? आम्ही मध्यमवर्गीय माणसं साधी जीवन शैली आणि उच्च विचारसरणी जपतो. ” मी त्यांचा समोर हात जोडले “खरंच माझ चुकलंच आत्ता पर्यंत हाई स्टँडर्ड च्या मोहात मी आपलेपण विसरले.”
© सौ. स्मिता माहुलीकर
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈