सुश्री मंजुषा सुनीत मुळे
☆ जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – आशीर्वाद ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
“आजी नमस्कार करते ग,”
” ये ये. दीर्घायुषी हो बाळ. देवीमातेच्या आशिर्वादाने तुला रामासारखा नवरा मिळू दे “.
आजी नातीला आशिर्वाद देत म्हणाली.
” नको आजी. मुळीच नको. ज्याने कोणा त्रयस्थाच्या सांगण्यावरून स्वतःच्या बायकोला घराच्या बाहेर काढलं, आणि पदोपदी ठेचकाळत जगण्यासाठी जंगलात सोडून दिलं, त्याच्या सारखा नवरा अजिबात नको आहे मला.”
“बरं बाई, तुला कृष्णासारखा नवरा मिळू दे. आता तरी खूश?”
“नको ग , तसा तर मुळीच नको. जो कुठल्या एकाच स्त्रीचा नवरा होऊन राहिला नाही, त्याच्यासारख्या मुलाशी लग्न करून काय करू मी? तसा नवरा तर नकोच.”
“कमाल आहे तुझी. रामासारखा नको, कृष्णासारखाही नको, मग नेमका कसा नवरा पाहिजे बाई तुला?”
” हे बघ, मला असा नवरा पाहिजे जो मला एखादी निर्जीव पाषाणमूर्ती समजणार नाही. किंवा एखादं खेळणंही समजणार नाही. माझ्या नवऱ्याने माझ्याकडे एक माणूस
म्हणून पहावं- वागावं….बस… एवढीच इच्छा आणि अपेक्षा आहे माझी. ”
मूळ हिंदी कथा : डॉ. लता अग्रवाल
अनुवाद :…… सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈