श्रीमती उज्ज्वला केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ काळोखाची कूस ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

आता अंधार्‍या वाटेवर चालताना

जुन्या आठवणींच्या सुखद स्मृती मागे-पुढे येताहेत

दिवली होऊन….

आईचा पदर धरून घरभर फिरणारी मी

शाळेत  गेल्यावर

घरच विसरणारी मी

गाण्याच्या स्पर्धेत सुवर्ण चषक घेऊन

घरी आलेली मी….

आणि कौतुकाच्या डोळ्यांनी ओवाळणारी आई …..

आणि चषक घेऊन घरभर नाचणारी मी

 

तुझ्या बाहुवर, अवघं विश्व विसरून

नि:शंकतेने झुलणारी मी

आणि आश्वस्त करणारे तुझे बलदंड बाहू …..

नि आश्वस्त होणारे मी ……….

 

बाळाची चाहूल लागल्यावर

विस्मित, आनंदित मी ……

बाळाला मांडीवर घेऊन दूध पाजताना

स्वर्गसुख म्हणतात ते हेच, असं म्हणत

प्रत्येक क्षण असासून जगणारी मी ….

 

 बाळाचं तरुण होणं कधी कसं घडलं

 कळलंच नाही……

मग त्याच्यावर भाळून घरी आलेली राजकन्या ,

माझी बाळी कधी झाली, कळलंच नाही…..

 

मग त्यांचा अंकूर, तजेलदार, टवटवीत, गबदूल

गडबड्या, बडबड्या, धडपड्या

मांडीवर लोळत

आजी गोष्ट…  आजी गोष्ट…

चा लकडा लावणारा…..आणि त्यांना  गोष्ट सांगताना 

पन्हा एकदा आईपण अनुभवणारी मी …..

 

सांजवेळी बागेतल्या झोपाळ्यावर बसून

 उतरती ऊन्ह पाहत,

 जुन्या कडू-गोड आठवणींची उजळणी करत,

  तृप्त, कृतार्थ जीवन जगल्याचा

  आनंद जागवते आहे   

  या क्षणी 

समोरून जाणारी ती अंधारी वाट

खुणावते आहे ‘चल लवकर’

म्हणते आहे.

मी त्यावरून चालते आहे.

मी पुढे पुढे जाते आहे…..

माझ्या सुखद स्मृती

मला साथ करताहेत.

कदाचित काळोखाची कूससुद्धा

इतकीच सुंदर, सुरम्य असेल.

 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments