श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ अज्ञात ग्रहाचे रहस्य – भाग 1… (भावानुवाद) – श्री सुशांत सुप्रिय ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(अज्ञात ग्रहाचे रहस्य ( हिन्दी कथेचा अनुवाद))
अंतरिक्ष-यान ‘ इंडियाना ‘ची मुख्य चालक कमांडर अल्पना चावला होती. या अंतरिक्ष-यानात आणखी चार पुरुष अंतरिक्ष-यात्री होते. श्री हरिकोटा अंतरिक्ष-केंद्रातून काही वर्ष आधी २५१० मध्ये उड्डाण केल्यानंतर हे यान आमच्या सौर-मंडळाच्या बाहेर पडलं होतं. पण अजूनही श्री हरिकोटाशी याचा सम्पर्क होत होता. आता ‘ इंडियाना ‘ अंतरिक्ष-यान, एंड्रोमीडा गैलेक्सीत, तिथला एक तारा ‘अल्फ़ा-सेंटौरी ‘ च्या सौरमंडळात उड्डाण भरत होतं.
अचानक त्यांना आपल्या अंतरिक्ष – यानाच्या स्क्रीन वर एक मोठा -सा ग्रह दिसला. दुरून तो पृथ्वीसारखाच नीळा, हिरवा आणि भूरा वाटत होता. अंतरिक्ष-यानातील सगळे प्रवासी अतिशय उत्साहित झाले. या ग्रहावर जीवन असण्याची संभावना होती. काही दिवसांच्या प्रवासानंतर, अंतरिक्ष-यान ‘ इंडियाना ‘ त्या ग्रहाच्या कक्षेत पोचलं. खगोलीय प्रवासाच्या इतिहासात, हे प्रथमच घडत होतं की दुसर्या एखाद्या आकाशगंगेच्या तार्यााच्या, एखाद्या ग्रहावर मनुष्य पाऊल ठेवणार होता. श्री हरिकोटाशी सातत्याने सम्पर्क होत होता. परंतु जेव्हा अंतरिक्ष-यान त्या ग्रहाच्या जमिनीवर उतरणार होतं, तेव्हा अचानक त्याचा श्री हरिकोटाशी सम्पर्क तुटला. दोन्हीकडच्या वैज्ञानिकांनी आपापसात सम्पर्क प्रस्थापित करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु त्यांना यश लाभलं नाही. शेवटी श्री हरिकोटा केंद्रा ने अंतरिक्ष-यान ‘ इंडियाना ‘ अंतरिक्षात हरवल्याचं जाहीर केलं.
या घटनेनंतर काही वर्षांनी श्री हरिकोटा अंतरिक्ष-केंद्रातून आणखी एका अंतरिक्ष-यानाने ‘ इंडियाना-2 ‘ ने उड्डाण केलं. त्याचा उद्देश हरवलेलं पहिलं अंतरिक्ष-यान ‘ इंडियाना ‘ बद्दलची माहिती मिळवणे हा होता.
अंतरिक्षामधे काही वर्षे उड्डाण केल्यानंतर आता ‘ इंडियाना-2 ‘सुद्धा एंड्रोमीडा गैलेक्सी चा तारा अल्फ़ा सेंटौरी च्या सौरमंडळात उड्डाण करत होतं. अखेर हे यांनही पृथ्वीसारख्या दिसणार्यां निळ्या, हिरव्या, भुर्या् ग्रहाच्या कक्षेत पोचले.
या अंतरिक्ष-यानाचं ‘ इंडियाना-2 ‘ चं नेतृत्व कुशल आणि अनुभवी अंतरिक्ष-यात्री कमांडर भरत सिंह करत होते. त्यांच्या दलात पाच अन्य पुरुष अंतरिक्ष-यात्री होते. आत्तापर्यंत या अंतरिक्ष-यानाचा सम्पर्क श्री हरिकोटाशी होत होता. कमांडर भरत सिंह यांनी एक छोटं अंतरिक्ष-यान या ग्रहाच्या पृष्ठभागावर उतरवण्याचा निर्णय घेतला. मूळ यान आणि अन्य अंतरिक्ष-यात्री या ग्रहाच्या कक्षेतच फिरणार होते. कमांडर भरत आणि एक अंतरिक्ष-यात्री फ़्लाइट लेफ्टनंट सुरेंद्र कुमार यांचा गट एक छोटं अंतरिक्ष-यान घेऊन त्या ग्रहावर उतरण्यासाठा निघाले. ढगांना चिरत जेव्हा ते या ग्रहाच्या जमिनीवर उतरले, तेव्हा पृथ्वीसारखीच इथली संस्कृती बघून हैराण झाले॰
अंतरिक्ष-यान एका मोठयाशा मैदानात सहजपणे उतरलं॰ नाशिबाची गोष्ट अशी होती की या ग्रहाच्या वायुमंडळातदेखील ऑक्सीजन होता. कमांडर भरत अंतरिक्ष-यानातून खाली जमिनीवर उतरले. त्यांना स्पेस-सूट आणि ऑक्सीजन-सिलिंडरची आवश्यकता भासली नाही. इथलं सगळं वातावरण प्रदूषण-रहित पृथ्वीसारखंच होतं. फ़्लाइट लेफ्टनंट सुरेंद्र कुमार छोट्या अंतरिक्ष-यानातच बसून राहिले. कुठलीही आपत्कालीन स्थिती उद्भवली तर आपलं यान उडवून, या ग्रहाच्या कक्षेत फिरणारं यान इंडियाना -2 च्या जवळ पोचता येईल, असा त्यांचा विचार. कमांडर भरत अंतरिक्ष-यानातून बाहेर पडताच त्यांना सात फूट ऊंची असलेल्या धट्टया-कट्ट्या डझनभर महिलांनी घेरलं. त्यांच्या हातात लेसर गनसारखी धोकादायक हत्यारं होती. विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे या महिला सैनिक हिन्दी भाषा जाणत होत्या. त्यांनी कमांडर भरतला बंदी बनवून आपल्या राणीकडे नेलं. अमेज़ोनियन विमेन , “ कमांडर भरतच्या तोंडून बाहेर पडलं.
कमांडर भरतने त्या महिलांची राणी पहिली, तेव्हा त्यांच्या आश्चर्याला सीमा उरली नाही. कारण ती राणी म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून काही वर्षापूर्वी हरवलेल्या अंतरिक्ष-यान ‘ इंडियाना ‘ ची मुख्य चालक कमांडर अल्पना चावला होती.
अल्पना चावला म्हणाली की त्यांचं अंतरिक्ष-यान ‘ इंडियाना ‘ या ग्रहावर उतरातांना हवा आणि खराब वातावरणामुळे क्रॅश झालं. तिचे सगळे सहयात्री त्या दुर्घटनेत मारले गेले.
या ग्रहावर उंच निंच, तगड्या स्त्रियांचं तेव्हा शासन होतं. या ग्रहाच्या अमेज़ोनियन महिलांनी अल्पना चावलाचा आपल्यामध्ये सहर्ष स्वीकार केला. हळू हळू ती इथे लोकप्रिय झाली. अल्पना ने या ग्रहावरील महिलांना हिंदी भाषा शिकवली. आणखीही किती तरी गोष्टी तिने त्यांना शिकवल्या. त्या सगळ्या तिचा सन्मान करू लागल्या. काही महिन्यापूर्वीच या महिलांनी अल्पनाला आपली राणी बनवले.
इथल्या महिलांनी यापूर्वी कधी कुणी पुरुष पहिला नव्हता. इथे प्रयोगशाळेत काही तांत्रिक गोष्टींचा आधार घेऊन मुलांचा जन्म होत असे. सगळ्या महिला लेस्बियन होत्या. त्या आपापसात यौवन संबंध प्रस्थापित करत. त्यामुळेच कमांडर भरत इथल्या बायकांसाठी एक वेगळेच कुणी तरी प्राणी होते. त्या पुन्हा पुन्हा त्यांना स्पर्श करून बघायच्या. कमांडर भरत त्यांच्यासाठी कुणी अद्भूत जीव होते. त्या अतिशय कुतुहलाने त्यांच्याकडे पहात होत्या.
क्रमश:…
मूळ कथा – अज्ञात ग्रह का रहस्य मूळ लेखक – श्री सुशांत सुप्रिय
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈