सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ कायमस्वरूपी… – सुश्री मीरा जैन ☆ (भावानुवाद) सौ. उज्ज्वला केळकर ☆
सुश्री मीरा जैन
टेबलावर बदलीसाठी ठेवलेला मनोजचा अर्ज बघून मी. रतन गुप्ता आश्चर्यचकित झाले. कारण अलिकडेच त्याने नवीन बंगला बांधला होता आणि तो अतिशय खूश होता. आपली बदली होऊ नये, असं त्याला अगदी आतून आतून वाटायचं. जर कधी झालीच, तर तो एकटाच जाईल. त्याचं कुटुंब मुलांच्या शाळेच्या दृष्टीने कायम स्वरूपी इथेच राहील.
पण आज अचानक त्याचा बदलीसाठी अर्ज? गुप्तांनी त्याला आपल्या चेंबरमध्ये बोलावले.तो आत आल्या आल्या त्यांनी विचारलं, `कालपर्यंत तर तू बदली होऊ नये म्हणून विनवण्या करत होतास. बदली न झाली तर बरं, असं म्हणत होतास. नशिबाने जर झाली, तर कुटुंब इथेच ठेवीन, असंही म्हणाला होतास. मग आज असं काय संकट आलं की तुला बदली हवीशी झाली. खरं खरं सांग!’
प्रथम मनोजला संकोच वाटला, मग धैर्यपूर्वक त्याने आपली व्यथा सांगितली, `गावाकडे राहणार्या आई-वडलांना जेव्हा कळलं की आता मी माझं घर बांधलय आणि मी आता कायमस्वरूपी इथेच राहणार आहे, तेव्हा तेही आपली गाठोडी-पासोडी, बॅगा – वळकटी घेऊन कायमचं राहण्यासाठी इथे येत आहेत.
मूळ हिन्दी कथा – स्थायी – मूळ लेखिका – सुश्री मीरा जैन
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈