☆ जीवनरंग ☆ काळजी ☆ सौ. अंजली गोखले ☆
काकूंचा स्वयंपाक आवरला. हुश्श्य म्हणून पदराने चेहरा पुसत त्यांनी खुर्चीवर बसकण मारली. काम करून किती दमली आहे असं त्यांना काकांना दर्शवायचं होतं. पण काका पेपर वाचण्यात दंग होते. काकूंनी आपली कॉमेंट्री सुरू केली, ” छे !किती उकडतंय. दमले बाई मी. या पोरांना मुळे वैताग आलाय. सगळे काम करायची आणि घरातच बसायचं. बाहेर जाणं नाही, शॉपिंग नाही, भिशी नाही, गप्पा नाहीत. कंटाळा आलाय नुसता. “एवढ्यात काकांच्या मोबाईल वाजला. नाइलाजानं का पुन्हा आपल्या बोलण्याला ब्रेक लावावा लागला.फोनवरचं बोलणं काका नुसतं ऐकत होते. थोड्याच वेळात त्यांनी मोबाईल स्विच ऑफ केला. “काय बाई तरी! बोलणं नाही,गप्पा नाहीत,.”काकू मनातच म्हणाल्या. कारण काकांच्या चेहऱ्यात काहीसा बदल झाल्यासारखा वाटला त्यांना. सिरीयस म्हणाना!
खुर्चीतून उठताच काका म्हणाले. “एवढी कंटाळी आहेस ना? वैतागली आहेस ना? चल जरा गाडीतून चक्कर मारून येऊ.”. काकू एकदम हरखून गेल्या. गाडीतूनच जायचे म्हणून साडी ठीक केली आणि पटकन तयार झाल्या. काका मात्र काहीच बोलत नव्हते. कोरोनामुळे गर्दी नव्हतीच रस्त्यावर. गाडी सुसाट गावाबाहेर आली. “अहो इकडे कुठे आलो? एवढा काळा धूर दिसतो आकाशात? अहो, हे को विड पेशंट चे स्मशान आहे ना?बापरे! पत्रे मारलेत वाटतं. हे लोक बिचारी झरोक्यातून डोकावतात. कशाला आलो इकडं? “थोडं पुढे जाऊन काकांनी गाडी थांबवली. खिडकीतून बाहेर पहात काकू म्हणाल्या, “अहो ती मुलगी पाहिलेत का? बिचारी त्या डोळ्यांमधून डोकं पाहते हो. अहो ती शरद भाऊजींची मीरा आहे ना? हे कशाला इथे आली?” काकूंचा आवाज आता फारच काळजीचा झाला होता.
गाडी रस्त्याच्या कडेला पार्क करत काका म्हणाले, “बरोबर ओळखलस तू.ती शरीराची मिराच आहे. शरद कोरो ना मुळे गेला. निदान त्याचा चेहरा पाहायला मिळावा म्हणून मेरा आलीय इथे. बाहेर लोकांची काय अवस्था आहे, हेच दाखवायला तुला चल म्हटलं. नुसतं भिशी नाही, शॉपिंग नाहीम्हणून तुम्ही बायका त्रासून जाता.इतरांवर काय भयानक प्रसंग येतोय, किती यातना त्यांना सहन कराव्या लागतात ते बघ. तू गाडीतच थांब मी येतो पाच मिनिटात.”
काका गेल्यावर काकूंच्या छातीत अक्षरशः धडधडायला लागलं. ते भयाण भिषण दृश्य पाहणे क्लेशकारक होतं. अशी किती बळी कोरूना ने घेतले असतील? किती घरं उद्ध्वस्त झाली असतील? कसं सावरायचं यांनी? काकूंना काही सुचेना. आपण घरात राहतो ते किती सुखावह आणि प्रोटेक्टीव आहे. मीरा आणि तिच्या आईच्या आठवणीनेत्या कासावीस झाल्या. त्यांच्या काळजीने काकूंच्या मनाला घेरून टाकलं.
© सौ. अंजली गोखले
मो ८४८२९३९०११
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈