सौ अनघा कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “अशी माणसं : अशी साहसं” – लेखक : श्री व्यंकटेश माडगूळकर ☆ परिचय – सौ अनघा कुलकर्णी ☆

पुस्तक : अशी माणसं : अशी साहसं

लेखक : श्री व्यंकटेश माडगूळकर

व्यंकटेश माडगूळकर यांची साहित्य विश्वा त ग्रामीण कथा-कादंबरीकार म्हणून ओळख आहेच तसेच ते एक निसर्ग प्रेमी, प्राणी प्रेमी होते हे आपल्याला माहित आहे.या त्यांच्या प्रेमा पायी त्यांनी राने वने धुंडाळली जंगले पायाखाली घातली ,निसर्गाच्या सानिध्यात राहून निरीक्षणे केली  रेखाटने केली, अनुभव घेतले ,विपुल वाचन केले आणि लेखनही  केले.

असेच थोड्या वेगळ्या विषयावरचे त्यांचे पुस्तक आहे ,अशी माणसं :अशी साहस जीवनात बरेच जण मळलेल्या वाटांनीच वाटचाल करतात .स्वतःच्याच पावलांनी नव्या वाटा पडणारे, हव्या त्या ठिकाणी जाऊन पोहोचणारे ,अगदी थोडे.  या थोड्यांच्या वाटचालीसंबंधीच्या हकीगती सांगणारे, त्यांच्या ग्रंथाची ओळख करून देणारे, लेख माडगूळकरांनी नियतकालिकातून लिहिले .या लेखांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक.

अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा आपण सर्वांनीच वाचले आहेत.या कथेतील बहादूर दर्यावर्दी सिंदबाद आणि त्याच्या सात सफरी आपण वाचल्या आहे त. याच सफरीने प्रभावित होऊन टीम सेवरी न या भूगोल तज्ञाला वाटले की , पण सिंदबादप्रमाणे जहाजातून समुद्र पार करायचे सिंदबाद ने केले त्याच मार्गाने .या सफरींची तयारी आणि अनुभव याचे कथन या लेखात आहे.

 ‘जेन गुडाल ‘या त्यांनी केलेल्या चिंपांझी वानराच्या संशोधनामुळे प्रसिद्ध झाल्या .जेन गुडाल आणि त्यांचे पती यांनी टांझानियातील गोरो गारो या जागी राहून रान कुत्री ,कोल्हा आणि तरस यांचा अभ्यास केला.आणि त्यावर इनोसंट किलर्स ‘हे पुस्तक लिहिले .या  पुस्तकाचा सारांश आपल्याला या लेखात वाचायला मिळतो.

फरले मो वॅट नावाच्या माणसाने उत्तर ध्रुवा कडील ओसाड प्रदेशात केलेल्या प्रवासावर पुस्तक लिहिलं .ते वाचताना माणूस नावाचा प्राणी किती चिवट आणि किती जिद्दी आहे ,निसर्गाशी जुळवून घेत तो या पृथ्वीतलावर कुठे कुठे वस्ती करून राहतो ,हे या पुस्तकातून कळतं .आपण ज्याला संकट म्हणतो त्या अति अडचणी वाटतात . तिसऱ्या लेखात फरले व त्याचे पुस्तक याचा परिचय होतो.

ओरिया ही तरुणी जंगली हत्तींच्या कळपात चार-पाच वर्ष राहिली .त्यांचा टांझा नियाला असलेल्या लेक मन्या रा नॅशनल पार्क मध्ये साडेचारशे हत्ती होते .झाडावर चढून बसणारे सिंह होते ,गेंडे होते ,मस्तवाल रा न रेडे म्हशी होत्या .विषारी चुळा  टाकणारे सर्प होते .या सगळ्या पसाऱ्यात ओरिया राहिली.आपण घेतलेल्या अनुभवांना शब्द रूप दिले .ओरिया विषयी आणि तिच्या अनुभवाविषयी चौथ्या लेखात सांगितले आहे.

कुनो स्टूबेन नावाच्या अफाट जिद्दी तरुणाने एकट्याने नाईल नदी तरु न जाण्याचा निश्चय केला.अनेक संकटाशी सामना करत तो पार पाडला .आपल्या विलक्षण अनुभवाने भरलेले त्याचे पुस्तक आहे .’अलोन ऑन द ब्ल्यू नाईल’ या पुस्तकाचा सारांश या लेखात वाचायला मिळतो.

जिम कॉर्बेट हे नाव आपल्याला परिचित आहे ते नरभक्षक वाघांचा शिकारी म्हणून.परंतु जिम कॉर्बेट व्यक्ती म्हणून खूप वेगळा होता तो निष्णात शिकारी तर होताच पण सहृदय  माणूस पण होता .एखाद्या शास्त्रज्ञाच्या तोडीची निरीक्षण शक्ती आणि चौकसपणा त्याच्याकडे होता .भीतीवर त्याने नेहमीच विजय मिळवला .जिम कॉर्बेटचे कार्य आणि व्यक्तीचित्र आपल्याला इथे वाचता येते.

यानंतरच्या लेखात पक्षी तीर्थ की ही म डॉक्टर सलीम आलि त्यांची भेट व अनुभव याविषयी लिहिले आहे.

संग्रहातील शेवटचा लेख आहे मारोतराव चित्तमपल्ली यांच्या विषयी.चितमपल्ली लेखक म्हणून आपल्याला परिचित आहेतच परंतु एक व्यक्ती म्हणून ते कसे आहेत हे आपल्याला या लेखात कळते .एक मित्र असलेल्या या’ जंगलातील माणसाचे’ ‘माडगूळकर यांनी रेखाटलेले शब्दचित्र आपल्याला चित्तमपल्लींची नव्याने ओळख करून देते.

संग्रहातील सर्वच लेख वाचनीय आहेत .’साहस ‘या शब्दाची आपली व्याप्ती किती तोकडी आहे हे पुस्तक वाचताना जाणवत राहत .माडगूळकर यांच्या चित्रमय आणि सुबोध शैलीत हे अनुभव वाचणे म्हणजे एक वेगळा ,आनंददायी अनुभव आहे.__

परिचय : सौ अनघा कुलकर्णी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments