श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “पळा पळा कोण पुढे पळे तो…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

अरं पळा पळा.. त्यो राक्षस किंग कोहली मैदानावर आला… आपली काही खैर नाही आता… आता विमानतळाकडं पळत पळत जायला हवं… अन असेल त्या विमानात लपून बसायला पाहिजे… त्या पायलटला आपून पंधरा जण खेळणारं आनी बाहीर बसून नुसत्याच टाळ्या वाजिवनार दहा जनं मिळून वर्गणी काढूया आनि त्या इमान पायलटला सांगूया आधी इथनं इमान उडीव.. तुला लांब कुठं नेता येईल तिकडचं आमास्नी घेऊन जा… पण परत कराचीकडं इमान या जन्मात उतरवू नकोस.. घराची पन याद येनार नाही अश्या ठिकानी नेऊन सोडं.. काय तु मागशिल तेव्हढा पैका देतू हवा तरं… खेळायच्या मैदानात ते इंडियावालं काय पिऊन येतात कूणास ठावं…  ती आय सी सी कुठलीबी मॅच भारत इरुध पाकिस्तान असू दे..जित भारताची ठरलेली असतीया.. थोडा थोडका न्हाई सात वेळेला मार खाल्ला आम्ही..तरीबी एक डावं बी जितायचं नाव न्हाई.. आमच्या देशात काय आम्हाला जीतं ठेवतं नाहीत..म्हणून आम्ही जितं राहाण्यासाठी   परदेशात राहतुया…कुणाला न कळत…पन मॅचच्या वेळेला पीसीबी वालं आम्हालाचं हुडकून काढतात आनि घोड्यावर बसवतात…मनातनं आम्ही कवाचं हारलेलो असतो भारताच्या विरुद्ध खेळायचं म्हंजे…परवा बी खेळ सुरू झाला तवा आमचा डाव असा असा रंगात येऊ लागतो  माशाल्ला असं वाटतं वारे गब्रू खेळावं तर असं अन समोरच्याला खेळवावं तर ते बी असं… जोरजोराने टाळ्या वाजवून नि आरोळ्या मारून लै दंग्याचा धुरळाच पाडत असतो स्टेडियम मधी … पण हे काय मधीच भलतं झालं.. खेळ सुरू झाला नाही तोवर इकडं इकेट बी पडाया लागल्या कशा.. अरं तू अंपायर कुनाच्या बाजून हायीस…  आपलं काय ठरलेल्या हुतं त्यांच्या बॅंटींगच्या येळेला आम्ही तुला इचारनार अल्ला कुठं असतो.. तवा तू नसतं बोटं वर करून सांगायचं  .. बाकीचं आम्ही सांभाळून घेतू… आणि आमच्या बॅंटींगच्या येळेला एकदा हात आडवा नि एकदा उभा असा व्यायामं करायचा.. पन गड्या तशी येळचं आली न्हाई… आता हैका जगाच्या पाठीवर कुठं बी गेलो तरी बी हुडकून ही जनावरं आपल्या मारणार आपल्याच देशात आपल्याला जगायची चोरी.. चोरी नव्हे फाशीच देनार त्ये… आवं  तिथं साध्या चार वर्षांच्या पोराकडं एके असतीया खेळायला…त्याचं जो ऐकनार नाही आनी जो  गेम मधी जिंतनार नाही त्याचा गेम केलाच म्हणून समजा त्यानं… व्हय रं त्या विराटलाच एकदा इचारून बघता काय… म्हनावं तुझ्याच देशात आम्हास्नी थारा देतोस काय.. हे काळं तोंड लपवाया… विराटच एक मानुस असा हायं त्येच्यात ख्योळ बी हायं नि मानुसकी बी… आपल्या इथं काय हायं.. रोजचं जगायचं इथं वांद असतात.. तिथं असला सपाटून मार खाल्यावर आमचं मढं तरी शिल्लाक ठुतील म्हनतासा… नाव नको… अरं पळा पळा ती राक्षसी सेना  विराट कोहली वाली नव्हं तर आपलचं जातभाई यायला लागलेती… तवा धुम शेपुट घालून जोशात पळा… वाट फुटंल तसं पळा..  जी दिशा गावंल तिकडं पळा.. पण माघारी कराची कडं ढुंकूनही बघू नका…मागचं सगळं इसरा आणि येड्या वो ते क्रिकेट वगैरे ते बी इसरूनच जा… आपल्या बाच्यानं कधी जमायचं न्हाई ते.. आपून फक्त बाॅम्ब टाकायचे, गोळ्या घालायच्या, स्फोट करायचे… यातच आपण वर्ल्ड चॅम्पियन आहोत… तेच आपलं बेस हायं बघा…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments