सौ. सावित्री जगदाळे
☆ मनमंजुषेतून ☆ परळीचे पुरातन शीव मंदीर ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆
३१ जाने २० २१ रविवार रोजी सज्जन गड ला जाताना रस्ता चुकला. गडावर जाण्या ऐवजी परळीला गेलो. तिथे पक्का रस्ता संपल्यावर लक्षात आलं आपण चुकलोय . माघारी फिरलो तर एके ठिकाणी माळावर पडझड झालेले पुरातन शिवमंदीर दिसले. अनेक मंदिर होत. चुकून आलोय तर मंदीर बघूनच जाऊ असं म्हणून मंदिराकडे गेलो. एक मंदिर चांगले होते पण त्याला कुलूप होते. बाहेर डोके नसलेला नंदी होता. तिथेच जवळच उंच स्तंभ होता. नेहमीच्या दीपस्तंभा सारखा नव्हता. हे वेगळेपण. अलीकडे बरीच पडझड झालेलं एक शिवमंदीर होते ते मात्र उघडे होते. गाभाऱ्याच्या वरचा छताचा भाग मोकळा झाल्यामुळे पिंडीवर ऊन पडले होते कळस नव्हताच. दुरवर आणखी मंदिर होते. बाहेर उत्खनन करून काढलेले बरेच शिल्प शिळा उभ्या करून ठेवलेल्या होत्या . वीरगळ , सतीशिळा होत्या. एक हात असले ल्या अनेक सतीशीळा होत्या. पुरातन काळी हा भाग खूपच वैभवशाली होता असे जाणवत होते.
मंदिराच्या भिंतीवर अनेक प्रकारची कोरीव शिल्प अर्थपूर्ण होती. बाहेर बर्याच शिळा पडलेल्या होत्या. तिथेच बोर्ड लावलेला होता त्यावर लिहिले होते, पांडवकालीन केदारेश्वर मंदीर. परळी. जि. सातारा
परळी गावाच्या शेजारी असूनही खूपच दुर्लक्षित राहिलेले हे अतीसुंदर, पुरातन, वैभवशाली इतिहास सांगणारे असे हे मंदीर एवढे कसे दुर्लक्षित राहिले; तेही जग प्रसिद्ध अशा सज्जन गडच्या शेजारी असून… याचेच आश्चर्य वाटत होते. इथे उत्खनन होऊन या मंदिराचा इतिहास यावर संशोधन व्हायला हवं असं वाटते.
© सौ. सावित्री जगदाळे
संपर्क – १००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈