सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
मनमंजुषेतून
☆ नजमा – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
दुपारची वेळ. हंसत हंसत बुरखा घातलेली कोणीतरी जिना चढून वर आली.प्रथम मी तिला ओळखलेच नाही. तिने चेहर्यावरचा बुरखा काढलान. मग मी तिला ओळखल. अत्यानंदाने तिने माझा हात हातात घेतलान .पण मी तिला थोड्या लटक्या रागाने म्हटल,”कितने दिन बाद आयी है नजमा। कितने दिनसे तेरी याद करती हूँ।क्या हमारी याद कभी आती नही? नजमा हसत हसत म्हणाली “ऐसा कैसा हो सकता भाभी।हर दिनमुझे तुम्हारी याद आती है।आज मै बहोत खुष हूँ।तुम्हारे लिये पेढे और मिठाई लेके आयी हूँ।यह मेरी बेटी सायरा। स्काँलर्शिप हसिल की है उसने।और उसमे अव्वल आ गयी।और मेरे लिये खुषीकी बात ।मैने सबकुछ खुद उसे सिखाया पढाया। नजमाला आज माझ्याशी किती बोलू आणि किती नको अस झाल होत.नजमाच्या सासरच खटल बरच मोठ होत. त्यातूनही तिने स्वतः अभ्यास करुन सायराचा अभ्यास घेतला होता.तिचा छोटा मुलगा नासिर हाही हुषार होता.दोनच मुलांवर घरातल्यांच्या संमतीने कुटुंब नियोजन केल होत.स्वतःला शिकता आल नाही . पण दोन्ही मुलांना खूप शिकविण्याच तिच स्वप्न होत.तिचा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोरुन सरकायला लागला.माझ्या डोळ्यासमोर ती लहान आठ नऊ वर्षाची मध्यम गोरी गिड्डी थोडस नकट नाक दोन वेण्या घालणारी आणि फ्राँकमधली अशी छोटी नजमा दिसायला लागली. गाव सोडून कामासाठी ,पोटापाण्यासाठी आलेल कुटुंब काम शोधत होत. नेमक त्याच वेळी मला कोणीतरी कामासाठी हवच होत. योग जुळून आला. आमच्याकडे नजमाची आई रुकसाना कामाला यायला लागली. चार दिवसांनी आईबरोबर नजमाही यायला लागली.आठ दहा दिवसांत रुकसानाला आणखी चार पाच काम मिळाली. आणि मग आमच्या घरी नजमा एकटीच यायला लागली. आईपेक्षा तिचं काम चकाचक नीटस आणि व्यवस्थित होत. लवकरच तिची आणि माझी छान गट्टी जमली. रोज सकाळी आली की प्रथम केर काढायची. केर काढताना कधीतरी कुठतरी एखाद पैशाच नाण पडलेल दिसल की ती मला हाताला धरून त्या नाण्यापर्यंत घेऊन जायची. दुरुन तर्जनीने ते नाण पडलेल दाखवायची.तिच्या प्रामाणिकपणाबद्दल माझा तिच्यावरील विश्वास आणखी द्रुढ झाला. केर झाला की भांडी घासायची. नंतर मी तिचा अभ्यास घ्यायची. तिची हुशारी, आकलनशक्ती,आणि शिकण्याची जिद्द बघून मलाही तिला शिकविण्यात हुरूप वाटायला लागला. अभ्यास झाला की मगइथेच तिची पोटपूजा व्हायची. पाच मिनिटाच्या अंतरावर समोरच्या झोपडपट्टीत तिच घर होत. घरी जाऊन दप्तर घेऊन लगेच शाळेत जायची. नजमा–चमकता तारा! नावाप्रमाणे लवकरच शाळेत हुशार विद्यार्थिनी म्हणून चमकायला लागली. कधी निबंध कधी वक्त्त्रुत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागली. मी ‘तिला शिकविण्यात आपण कुठे कमी पडायच नाही अस ठरवल.बरीच बक्षीस मिळवायला लागली. तिची आई रुकसानापण खुश झाली होती. शाळेत नजमाला तिच्या मैत्रीणी शिक्षक तिला विचारायचे”नजमा यह सब तुझे कौन सिखाते है? ती उत्तर द्यायची, ” मै कामको जाती हूँ,ना वो गीता भाभी मुझे सब सिखाती है।”रोज सकाळी कामाला आली कीआदल या दिवशी शाळेत घडलेल्या सगळ्या गोष्टींचा पाढा माझ्यासमोर वाचला जायचा.
क्रमशः….
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈