श्री सुहास रघुनाथ पंडित
मनमंजुषेतून
☆ मांगखुरी… — लेखक – डाॅ. विनय काटे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
मांगखुरीतल्या मांगिरापशी गेलं कि….
लय चांगलं वाटायचं
सगळा शिन भाग निघून जायचा
आंगात तरतरी यायची.
तिथल्या गारगोटी डोळ्यावर चमकून डोळे दिपवायच्या
आगरबत्त्यायच्या जळालेल्या काड्याची राख
आर्धी कपाळाला लावून
आर्धी जिभिवर ठेवत चघळन्यात वेगळीच मजा होती.
बारा पंधरा वर्षे मांगखूरिनं आम्हाला
भाकर चारली
मांगवाड्यातल्या सगळ्याच घरायला
हिंमतीनं जगायला शिकवलं.
अन मांगिरानं आमच्या पिकापान्याचं रक्षण केलं
आज तीच मांगखुरी
आमच्याकडून हिसकुन घेण्याचा
विचार चालू हाये
तिठं मोठमोठाल्या कंपन्या येणार हाये
हि बातमी आम्हाला कळाली तरि
आम्ही काही करु शकत नही
काहीच करु शकत नही
माय म्हंती
गायिला वासरु व्हतं
बाईला लेकरु व्हतं
पण जमिनिला तुकडा व्हत नही.
मायिला कसं सांगू ?
भाकर देणारी मांगखूरी
आता आपली राहणार नही?
लेखक : श्री किशोर त्रिंबक भालेराव
जालना. मो – 9168160528
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈