सुश्री शिल्पा मैंदर्गी
☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे –5 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆
(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)
जेव्हा माझ्या घरी आई-बाबांना समजले की मी आता काहीच पाहू शकणार नाही, अर्थातच काही करू शकणार नाही, काय बरं वाटलं असेल त्यांना?आता ही चा काहीही उपयोग नाही, अ सा जर त्यांनी विचार केला असता, तर माझ्यासाठी ते किती अवघड होतं. पण त्यांनी मला इतकं समजून घेतलं, इतकं तयार केलं म्हणूनच आज मी आनंदाने वावरू शकते.
घरामध्ये मी सारखी आईच्या या मागे मागे असायची. किचन मध्ये काहीतरी लुडबुड करायची. आईला सारखं लक्ष ठेवायला लागायचं. एके दिवशी आईनं काय केलं, फुलाची परडी माझ्याकडे घेऊन आली आणि त्यात ली लाल फुलं उजवीकडे आणि पिवळी फुलं डावीकडे अशी ठेवली. माझा हात हातात घेऊन ते मला दाखवलं अर्थात स्पर्शज्ञानान मी
पाहिलं. सुई मध्ये दोरा ओवून दिला आणि एकदा उजवीकडच एक फुल आणि एकदा डावीकडचा एक फूल अस ओवायला शिकवलं आणि झाला कि छान हार तयार. आईचा हा प्रयोग यशस्वी झाला. अर्थात हिला जमलं तर जमू दे कंपल्शन
केलं नाही. मलाही तो नाद लागला आणि आमच्या देवाला रोज रंगीत फुलांचा मिळायला लागला. भाजी निवडायला हीआईनं मला शिकवलं. किसणीवर खोबरे किसायच, गाजर किसायचं हेही मी शिकले. माझी आई जर त्यावेळी टी पं गाळत बसली असती तर आजची मी तुम्हाला दिसलेच नसते. घरातलं ट्रेनिंग मला आईने दिलं आणि बाहेर शाळेमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त वक्तृत्वाचे धडे माझ्या बाबांनी गिरवून घेतले. खरंच या दोघांचा किती मोठा वाटा आहे माझ्या व्यक्तिमत्व घडणीमध्ये !दोन्ही महत्वाचे होते. मी स्वयंपाक करू शकणार नव्हते पण आईला इतर कामात मदत करू शकले ‘अजूनही करते आहे.
मी साधारण सातवीत असताना टेप रेकॉर्डर, टेलिफोन आमच्या घरी आला.गाणी ऐकता ऐकता तो बंद कसा करायचा ते हात फिरवून मी बघायला लागले.माझ्या भावाच्या आणि बहिणीच्या ते लक्षात आल्यावर त्यांनी मला प्ले, स्टॉप, रेकॉर्ड या सगळ्या बटनां नी माझ्या बोटांनी ओळख करून दिली. रिवाइंडिंग कसं करायचं हेही शिकवलं. त्याचा मला पुढे खूपच उपयोग झाला. एम ए चा अभ्यास करताना मॅडम जे वाचून दाखवत ते मी टेप करून घेत होते. आणि मला पाहिजे तेव्हा ऐकू शकत होते. याच प्रमाणे नवीन आलेला फोन कुतुहलाने मी हात फिरवून ओळख करून घेत होते. माझ्या भावाने हाउ टू ऑपरेट हे मला शिकवलं. रिसिव्हर हातात दिला फोनवरील बटनांची एक ते नऊ आकड्यांची ओळख करून दिली. ते कसे दाबायचे तेही शिकवलं. 22 आकडा असेल तर दोन चे बटन दोनदा दाबायचे असे सांगितले. मी तशी करत गेले आणि आणि मला अपोआप फोन नंबर रही पाठ होत गेले. मुद्दाम पाठांतर असे करायला लागले नाही.
रेडिओ लावणे मला खूप सोप्प वाटलं. खूप आवडलं सुद्धा. काही वर्षांनी याच रेडियो मधून माझा आवाज मी ऐकू शकेन असे मला वाटले सुद्धा नव्हते. सांगली आकाशवाणी वरून ऊन आणि कोल्हापूर आकाशवाणीवरून माझी मुलाखत प्रसारित झाली आहे बर का !
अर्थात मला सगळेच येते असेही नाही. बाहेर जाताना कोणाच्यातरी मदतीशिवाय मी अजूनही जाऊ शकत नाही. पूर्वी मला बाबा म्हणायचे तुला पांढरी काठी घेऊन देऊया त्याची सवय कर म्हणजे तुला चालायला सोपे जाईल. पण पण त्यावेळी मी त्यांचे ऐकले नाही. तशी मी हट्टी होते.
रेग्युलर शाळेमध्ये जात असल्यामुळे आणि बाईंनी शिकवलेले सगळे समजत असल्यामुळे ब्रेल लिपी शिकण्याचे मला महत्त्व वाटले नाही. एकदोनदा मी प्रयत्न केला होता. पण तिथल्या वातावरणामुळे मला तिकोडी लागले नाही. मी ऐकून शिकायचे, लक्षात ठेवायचे, सांगायचे यामध्ये घोडदौड सुरू ठेवली.
आई सांगते लहानपणी माझं सुसाट काम होत. जीना सुद्धा सहज धडधडत उतरायची. बघणार यालाच भीती वाटायची इतरांनाच खूप काळजी वाटायची.
माझ्या स्वतःच्या वस्तू म्हणजे कंपास, पेन्सिल पेन रबरसगळं मी व्यवस्थित ठेवायची.मात्र माझ्या भावाला बहिणीला त्यांची एखादी वस्तू सापडेना झाली की खुशाल माझ्यातली काढून घ्यायची.मला समजल्यावर मी त्यांच्यावर खूप रागवाय ची. अर्थात ते थोडाच वेळ टिकायचं.
माझ्या काकूच्या आईने मला क्रोशाचे काम शिकवल. त्यांनी मला साखळी घालणे, खांब घालणं शिकवलं होतं. त्याचा मी रुमाल ही के ला होता. अजून मी तो जपून ठेवला आहे. आत्तासुद्धा क्वचित मला क्रोशा चं मिळण्याचा मोह होतो. मी कधीतरी करते.
घरी कोणी आले तर त्यांना पाण्याचा तांब्या पेला नेऊन देते, आईने तयार केलेला चहा ती कप बशी मी देते.सगळ्यांना खूपच आश्चर्य वाटते.पण मी हे सगळं सरावाने आणि आईला थोडीतरी माझी मदत व्हावी मुद्दाम शिकले आहे.
मागच्या वर्षी माझ्या बाबांना दवाखान्यात न्यायचे होते. त्यावेळी मी आधी फोन करून डॉक्टरांची अपॉईंटमेंट घेतली होती. बाबांना रिक्षातून घेऊन गेले होते. सगळ्यांना त्याच्या इतकं आश्चर्य वाटलं की काही विचारू नका.
आवाजावरून मी लोकांना बरोबर ओळखण्याचा प्रयत्न करते. त्यामध्ये यशस्वी होते. मग काय विचारता भेटणारी व्यक्ती कौतुकच कौतुक करते. पण लक्षात ठेवणे हे मी मेंदुवर इतकं बिंबवलं आहे कि त्यामुळेच मी सगळं लक्षात ठेवू शकते.
आमच्या घरी वॉशिंग मशीन आणल्यानंतर मी तेसुद्धा शिकून घेतलं आणि सध्या तर मीच ते ऑपरेट करते. आईचं तेवढच एक मोठं काम कमी होतं ना !तेवढीच आईला मदत होते, तिला विश्रांती मिळू शकते याचा मला खूप आनंद होतो.
कॉलेजचा अभ्यास, वक्तृत्व स्पर्धा, गॅदरिंग, मैत्रिणी आणि आईने शिकवलेली घरातली काम हे सगळ करण्यामध्ये माझं बी. ए.वर्ष कसं संपलं समजले सुद्धा नाही.
…. क्रमशः
© सुश्री शिल्पा मैंदर्गी
दूरभाष ०२३३ २२२५२७५
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈