श्री मोहन निमोणकर
☆ “मन साफ तर सर्व माफ…!!” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆
कधीकधी केराचा डबाही, मनापेक्षा बरा वाटतो…!
दिवसातून एकदा का होईना निदान तो रिकामा तरी होतो…!!
आपण मात्र मनात कितीतरी, दुःखद आठवणी साठवतो…
काय मिळवतो यातून आपण…? स्वतःचे दुःख वाढवत रहातो…!
घडून गेलेल्या वाईट गोष्टी, वर्षानुवर्षे मनात ठेवतो…
त्या ज्याच्यामुळे घडल्या, त्यांचा पुढे तिरस्कार करतो…!
आता केराच्या डब्यासारखच, दररोज मनही साफ करायचं…
विसरून सारे जुने दुःख, स्विकारुन नव्या सुखांना आनंदाने भरायचं…!
सुखी जीवनाचे तंत्र आता आपण सर्वांनीच शिकायचं.
स्वतः नेहमीच आनंदी रहायचं…!
आणि, दुसर्यांनाही आनंदी ठेवायच…!!
मन साफ तर सर्व माफ…!!
आपला दिवस आनंदात जाओ ||
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈