सुश्री नीता कुलकर्णी
☆ ‘यात काही राम नाही’…. म्हणजे काय ? ☆
आपण सहज जेव्हा म्हणतो यात काही राम नाही… म्हणजे काय ?
राम याचा अर्थ काय ?
राम असणे म्हणजे आनंद…
राम म्हणजे देव, दशरथ नंदन ,कोदंडधारी, सीतापती, कौसल्याचा पुत्र, असा इतकाच त्याचा अर्थ नाही.
राम म्हणजे परिपूर्णता ,सौख्य ,सुख, विश्राम …. राम म्हणजे आंतरिक समाधान……
सेतू बांधताना खारीने रामरायांना मदत केली .त्यांनी तिच्या पाठीवरून हात फिरवला .म्हणून खारुताईच्या पाठीवर रामाची बोटं उमटली आहेत…
चांगलं काम केलं की रामराया पाठीशी उभा राहतोच..
खारीचा वाटा आपणही उचलूया. काय करूया तर…
… एक श्लोकी रामायण आहे ते पाठ करू या .
सहज सोपं जमणार आहे आणि त्याच्याशी निगडित कायमची आठवण राहणार आहे ती आपल्या राम मंदिराची.
तर हे काम जरूर करा ही नम्र विनंती.
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈