श्री सुजित कदम
फोन नंबर…!
श्री सुजित कदम जी की कवितायेँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं।
कविता “फोन नंबर ….!” एक अत्यन्त मार्मिक कविता है जिसने 12.03.2019 को महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे की काव्य गोष्ठी में सबके नेत्र नम कर दिये थे।
श्री सुजित कदम जी के शब्दों में – “सामाजिक बांधिलकी जोपासताना समाजाच हे वास्तव याकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही.”
त्या दिवशी
पहाटेच हाँस्पिटल मधून
मी मुलाला
तिन चार वेळा
फोन लावल्यानंतर
मुलाने फोन उचलला.
मी म्हटलं
”पोरा आज तरी आईला भेटायला येशील ना”
एका क्षणाचाही विलंब न लावता
त्यांन उत्तर दिलं..,
बाबा आजचा दिवस ही आईला व्हेंटिलेटरवर
नाही का ठेवता येणार…?
आज माझी महत्वाची
मिंटिग ठरलीय..,
आणि.. . . .
आजच्या मिटिंग साठी मी
खूप वर्षे वाट पाहिलीय….,
किंवा तसं काही झालंच तर…,
तुम्ही सर्व क्रिया करून घ्या
मला वेळ मिळेल तेव्हा
मी येऊन
अस्थी विसर्जन करेन..,!
मी काही बोलायच्या आतच
त्याने फोन
कट केला..!
आज तीन वर्षे झाली…
तिला जाऊन.
तो काही आला नाही..
आणि त्याचा फोनही..,!
कदाचित..,
कदाचित त्याने
फोन नंबर बदलला असावा…,
मी गेल्या नंतर त्याला
पुन्हा फोन येईल
ह्या भितीने…!!
© सुजित कदम, पुणे
मोबाइल 7276282626.