सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 163
☆ मनी दाटे हूरहूर ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
पक्षी जाता दूरदूर
मनी दाटे हूरहूर
चार दिसांसाठी येती
आणि उडुनिया जाती
लेक सून नातवंड
स्रोत प्रीतीचे अखंड
दूरदेशी राहण्यास
परी नित्य आसपास
असो सुखात कुठेही
मोकळ्या या दिशा दाही
विस्तारल्या कक्षा आणि
घरोघर ही कहाणी
मायबाप मायदेशी
पिले उडती आकाशी
असे क्षेम दोन्ही कडे
आनंदच चोहिकडे
परी वाटे हूरहूर
परतून जाता दूर
© प्रभा सोनवणे
(३ जानेवारी २०२२)
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सुंदर…..
धन्यवाद